आता साखरेच्या पाकिटावरही प्रमाण छापणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य देश

आता साखरेच्या पाकिटावरही प्रमाण छापणार

नवी दिल्ली – साखर, मीठ आणि मैदा या तीन खाद्यपदार्थांच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे आजार होत असल्याने त्यांचे प्रमाण पाकिटावर छापण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पदार्थांचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे काय दुष्परिणाम होतात हे छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सिगरेट, तंबाखू, गुटख्याच्या पाकिटांप्रमाणेच साखर, मीठ आणि मैद्याच्या पाकिटावरही वैधानिक इशारा छापण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

ह्रदयरोग आणि मधुमेहाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देशात अधिक आहे. साखर किंवा तत्सम पदार्थांच्या अतिसेवनामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. तर मीठ आणि मैद्याच्या अतिसेवनामुळे ह्रदयरोग जडू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने साखर, मैदा, मीठाच्या पाकिटांवर या पदार्थांचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यामुळे काय दुष्परिणाम होतात हे छापण्याचा निर्णय घेतला आहे. यासह सावधानतेचा इशाराही छापण्यात येणार आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More