आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण

मुंबई – राज्याच्या सीईटी सेलकडून सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची कागदपत्रांची छाननी प्रक्रिया सीईटी सेलकडून सुरू आहे. दरम्यान, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यासाठी संबंधित प्राधिकरणाशी मदतीसाठी पत्रव्यवहार करावा लागतो. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेतील समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आता थेट सेतू केंद्रातील उपस्थित अधिकाऱ्यांशी आपल्या समस्यांविषयी चर्चा करून त्या सोडवू शकतात.

राज्यातल्या १२ सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांच्या समस्या सोडविल्या जात आहेत. या केंद्रांवरील अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या समस्या सोडवत असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. या वर्षी सर्व प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More