आता येतोय ‘वेब’ सिनेमा! – eNavakal
मनोरंजन मुंबई

आता येतोय ‘वेब’ सिनेमा!

मुंबई – महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसिरीज गावाकडच्या गोष्टीने एक नवं वळण घेतलं आहे, वेबसिरीजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही. कोरी पाटी प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी संत्या-सुरकी यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित संतुर्की या वेबसिनेमाद्वारे पाहता येणार आहे.

मराठी मनोरंजन जगातील हा पहिलावहिला प्रयोग असून व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून दर्शकांसाठी आपला पहिला टीजर प्रदर्शित केला होता, टीजरला प्रेक्षकांचा भरगोस मिळाल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली ती फक्त संतुर्कीची !… संतुर्की या वेबसिनेमाचा ट्रेलर 27 मे 2019 ला सकाळी 8 वाजता कोरी पाटी प्रोडक्शन्स या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. संतुर्की या वेबसिनेमामध्ये संतोष राजेमहाडीक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के. टी. पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलिकर, समाधान पिंपळें हे कलाकार देखील असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More