आता झेंडे आणि मायरा करणार ‘कॉमेडी’ – eNavakal
मनोरंजन मुंबई

आता झेंडे आणि मायरा करणार ‘कॉमेडी’

मुंबई – ‘चला हवा येऊ द्या’चे ‘होऊ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वत तुमच्या आमच्या-सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आणि या यशस्वी पर्वानंतर आता पुढे काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतानाच याचं उत्तर देखील प्रेक्षकांना ‘होऊ दे व्हायरल’च्या महान्तिक सोहळ्यात मिळालं. लवकरच ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत. यामध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेतील नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे झेंडे आणि मायारा यांची जोडी म्हणजेच अभिनेता उमेश जगताप आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे या मंचावर कॉमेडी करणार आहेत. त्यांच्या मालिकेतील भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ही जोडी कॉमेडी करून प्रेक्षकांना किती मनोरंजीत करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. लवकरच प्रेक्षकांना या पर्वात दोघांनाही पाहता येईल. याबद्दल बोलाताना अभिज्ञा भावे म्हणाली, कॉमेडी करणं हे आव्हान आमच्या रुटीनमध्ये वेगळेपण आणणार आहे. त्यामुळे आम्ही या पर्वासाठी खूपच उत्सुक आहोत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ठरलं! ‘चांद्रयान-2’ २२ जुलै रोजी झेपावणार

श्रीहरीकोटा – भारताच्या बहुप्रतिक्षीत ‘चांद्रयान 2’ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात...
Read More
post-image
मुंबई

प्रीतम हॉटेलचे मालक कोहलींचे दु:खद निधन

मुंबई – दादरमधील सुप्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांचे बुधवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९९८ मध्ये त्यांना मुंबईचे नगरपाल म्हणून मान देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला ३१ जुलैपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

नवी दिल्ली – अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा अहवाल स्वीकारला असून या प्रकरणावर तोडगा...
Read More
post-image
महाराष्ट्र

हुतात्मा समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई यांचे निधन

सांगली – जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई नागनाथ नायकवडी (वय 88) यांचे काल रात्री...
Read More