आणखी ९३१ गावात दुष्काळ जाहीर – चंद्रकांत पाटील – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आणखी ९३१ गावात दुष्काळ जाहीर – चंद्रकांत पाटील

मुंबई –  ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आणि कमी पर्जन्यमान झालेल्या राज्यातील आणखी ५० महसूल मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत असून त्यासंबंधीचा शासन निर्णय तत्काळ काढण्याचे निर्देश महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता.३) दिले. दुष्काळ निवारणासाठी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात ३१ ऑक्टोबर रोजी १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यातले ११२ तालुके गंभीर आणि ३९ तालुक्यात मध्यम स्वरुपाची दुष्काळी स्थिती आहे. केंद्र सरकारच्या दुष्काळी संहितेनुसार या तालुक्यात दुष्काळाची घोषणा करण्यात आली. याठिकाणच्या दुष्काळ निवारणासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्याने केंद्र सरकारला पाठवला आहे. त्याव्यतिरिक्त काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक दिसत होती; मात्र, त्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत झाला नव्हता. त्यामुळे त्यांनाही दुष्काळी मदत मिळावी; यासाठी मंडळाचा निकष निश्चित करुन, राज्यातील ज्या मंडळांमध्ये ७०० मिलिमीटरपेक्षा कमी व सरासरी पेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाला आहे, अशा २६८ मंडळांमध्येही याआधीच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

पण, त्यानंतरही राज्याच्या विविध भागात टंचाईची स्थिती बिकट असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून गेले काही दिवस सातत्याने करण्यात येत होती. या महसुली मंडळातील गावांनाही दुष्काळी मदत मिळावी; यासाठी पैसेवारी आणि कमी पर्जन्यमानाचा निकष निश्चित करुन दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सध्या राज्यभरातील सर्व गावांमधील पैसेवारी मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. पिकांची पैसेवारी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी असे विविध निकष तपासल्यानंतर राज्यातील आणखी ५० महसुली मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सर्व मंडळांना केंद्र सरकारच्या निकषानुसार मदत देता येऊ शकत नसल्याने, एनडीआरएफच्या नियमांनुसार राज्याच्या तिजोरीतून मदत दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासंदर्भात मंत्री पाटील म्हणाले की, पाणी टंचाई असलेल्या राज्यातील आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे. या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यापूर्वी जाहीर केलेल्या गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कर्ज वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची थकित वीजबिल भरून त्या योजना सुरू करण्यात येत आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरुपातील नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच जुन्या योजनांच्या दुरुस्तीसाठीही निधी देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता रोजगार हमी योजनेमध्ये १०० दिवसांऐवजी १५० दिवस मजुरी देण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे ३५० दिवस मजुरी देण्याचा राज्य शासन विचार करत आहे.
दुष्काळ असलेल्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहेत. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी घेण्यात आलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास संबंधित विद्यापीठांना सूचना केल्या आहेत. चारा उत्पादन वाढवावे, यासाठी गोरक्षण संस्थांनाही नाममात्र दरात गाळपेर जमिनी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More