आठवडाभरात ‘केसरी’ १०० कोटी क्लबमध्ये – eNavakal
देश मनोरंजन

आठवडाभरात ‘केसरी’ १०० कोटी क्लबमध्ये

मुंबई- होळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या केसरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम  ठोकली आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘केसरी’  चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  केसरी  चित्रपटाने ७ दिवसांत 100 कोटींचा आकडा पार करत बॉक्स ऑफिसवर  चांगलीच मजल मारली आहे.

2018 मधील पॅडमॅन, गोल्ड, 2.0 या चित्रपटाच्या बॅक-टू-बॅक यशासह अक्षय कुमारने 2019 मध्ये केसरी चित्रपटातून धमाकेदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी  केसरीने 21.06 कोटी रुपयांची बंपर कमाई करत बॉक्स ऑफिसवर ओपनिंग केली. शुक्रवारी चित्रपटाने 16.70 कोटी तर शनिवारी 18.75 कोटी, रविवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 21.51 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. सोमवारी चित्रपटाने 8.25 कोटी कमवले आणि मंगळवारी 7.17 कोटींची कमाई केली आहे.

या आठवड्यात  जंगली आणि नोटबुक हे चित्रपट रिलीज होणार आहेत. मात्र यामुळे केसरीच्या कमाईचे नुकसान होणार नाही. सारगरीच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित केसरीला श्रोत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहेेे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More