आझम खानवर बरसल्या स्मृती इराणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

आझम खानवर बरसल्या स्मृती इराणी

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे नेता आणि उत्तर प्रदेशच्या रामपूरचे सपा उमेदवार आझम खान यांनी केलेल्या ‘खाकी अंडरवियर’ या वक्तव्याबद्दल सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. रामपूरच्या भाजपा उमेदवार जयाप्रदा यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य करणाऱ्या आझम खान यांच्यावर सुषमा स्वराज यांच्या नंतर आता स्मृती इराणी यांनी देखील हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी म्हणाल्या, ‘एका महिलेविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले आणि समाजवादी पार्टीचे नेते गप्प बसले. मी विनंती करतेय की राजकारण एका ठिकाणी आणि भारतातील महिलांचं स्थान एका ठिकाणी आहे, ते तसंच ठेवा.

दरम्यान, रविवारी आझम खान यांनी जाहीर सभेत जयाप्रदा यांच्यावर नाव न घेता टीका करत म्हटलं होतं, ज्यांना मी बोट पकडून रामपूरला आणलं, १० वर्ष तुम्ही ज्यांच्याकडून आपलं प्रतिनिधित्व करवून घेतलंत त्यांचं सत्य समजायला तुम्हाला १७ वर्ष लागली पण मला १७ दिवसांत त्यांचं सत्य समजलंय की त्यांच्या खालील अंडरवियर खाकी रंगाचा आहे,’ या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका होत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
विदेश

श्रीलंकेत चर्च, हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील पाच चर्च आणि तीन फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला आहे. या हल्ल्यात ८० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले...
Read More
post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More