आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार – eNavakal
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री १ वाजून ३१ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होणार असून हे ग्रहण पहाटे ४.२९ मिनिटे दिसेल आणि पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पूर्णपणे सुटेल. चंद्रग्रहणाच्या प्रारंभास ६५.३ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेमध्ये येईल. पहाटे तीन वाजेपर्यंत चंद्राचा जास्त भाग झाकोळलेला असणार आहे.

शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेध नऊ तास आधी सुरू होतात, तर सूर्यग्रहणाचे वेध १२ तास आधी सुरू होतात. आजचे खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सुरु होणार आहेत. महाराष्ट्रीय पंचागात दिलेल्या माहितीनुसार, हे ग्रहण उत्तराषाढा नक्षत्रावर धनू व मकर राशीतून होत आहे. वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, या राशींना हे ग्रहण पीडक आहे. तसेच पूर्वाषाढा, उत्तराषाढा व श्रवण जन्मनक्षत्रे असलेल्या व्यक्तींना हे ग्रहण त्रासदायक आहे. तसेच हे ग्रहण आषाढ महिन्यात होत असल्याने पर्जन्यवृष्टी कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.

हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथूनही दिसेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More