आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 वा.पासून ते दुपारी 3 वा.पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.40 वा.पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी 09.53 वा.पासून दुपारी 2.42 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी डाऊन जलद, सेमी जलद मार्गावरील लोकल माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालविण्यात येतील. तसेच सायन-मुलुंड दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील आणि मुलुंडहून डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येतील. आपल्या शेवटच्या स्थानी 20 मिनिटे उशिरा पोहोचतील. डाऊन जलद मार्गावरील लोकल मुलुंडहून पुन्हा वळवण्यात येतील. तसेच सकाळी 10.46 वा.पासून दुपारी 3.18 वा.पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद, सेमी जलद मार्गावरील लोकल आपल्या थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला सस्थानकांवर थांबतील व आपल्या शेवटच्या स्थानी 15 मिनटे उशिरा पोहोचतील.

तसेच हार्बर मार्गावरील सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणारी सर्व डाऊन मार्गावरील लोकल बंद राहणार आहेत. सकाळी 10.21 वा. पासून दुपारी 3.00 वा.पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणारी सर्व लोकलही बंद राहणार आहेत. तरीही या ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वेवर साडेतीन तासांचा रात्रकालिन ब्लॉक

चर्चगेट-मरिन लाईन्सदरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री चर्चगेट-मुंबई सेेंट्रल दरम्यान सर्व चार मार्गावर 1.00 ते पहाटे 4.30 वा.पर्यंत रात्रकालिन ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार, रविवारच्या रात्री विरारहून 23.55 ला सुटणारी लोकल मुंबई सेेंट्रल स्थानकापर्यंत चालविण्यात येईल आणि हीच लोकल 91297 बनवून पुन्हा पाठवण्यात येईल. बोरिवलीहून 00.18 वा. आणि 00.30 वा. सुटणार्‍या लोकलही चर्चगेटऐवजी मुंबई सेेंट्रलपर्यंत चालविण्यात येतील. प्रवाशांना होणार्‍या त्रासाबाबत पश्चिम रेल्वेतर्फे खेद व्यक्त करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More