मुख्यमंत्र्यांच्या खोटेपणाचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत निदर्शने – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या खोटेपणाचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत निदर्शने

मुंबई- रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाला भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. ‘नाणार’ वरून गेले चार दिवस विधिमंडळाचे कामकाज रोखून धरण्यात आले आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांच्या या खोटेपणाचा निषेध म्हणून आज दादर (पूर्व) येथील रेल्वे स्थानकाबाहेर दुपारी 3 ते 5 या वेळेत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने दिला आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सांगितले.

काल परळ येथील शिरोडकर शाळेत कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष अशोक वालम म्हणाले की, माहिती अधिकारात सहमती दिलेल्या खातेदारांची नावे उघड झालेली असताना देखील विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी नावे सांगण्यास जीवितास धोका या कारणाखाली नकार दिला. जैन, शाह, मोदी, भुतडा आदी लोकांची नावे ते कुठल्या तोंडाने घेणार होते, अशी टीकाही त्यांनी केली. रत्नगिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी संदर्भातच सौदीच्या अरामको व अबुधाबीच्या अ‍ॅडनोक या कंपनीशी करार झाल्याचे प्रस्तुत कंपनीच्या वेबसाईटवरून स्पष्ट होते, तरीही करार वेस्ट कोस्टसाठी झाला असल्याचे धादांत खोटे विधान, विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामस्थांशी चर्चा सुरु आहे, चर्चा आणि सहमतीने प्रश्न सोडवू. मात्र अशी कुठलीही चर्चा सुरु नाही आणि आम्हाला कुठलीही चर्चा करायची नाही. भूसंपादनाचा अध्यादेश आम्हाला तात्काळ रद्द करून पाहिजे. मुख्यमंत्री प्रकल्प लादणार नाही असे म्हणताना करार मात्र होतच आहेत. आम्हाला कसलेही प्रेझेन्टेशन बघायचे नाही. आम्ही आमची गाव, घरे, देवस्थाने, बागायती सोडणार नाही. रिफायनरीला विरोध प्रखर करू, असा इशाराच वालम यांनी या सभेवेळी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More