नवी दिल्ली – १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आज देशभरात ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. परंतु आज केवळ आपल्या भारतातच नाही तर भारताव्यतिरिक्त अन्य 4 देशांतही स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. या देशांनाही 15 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळाले आहे. ते देश आहेत दक्षिण कोरिया, कांगो, बहरीन आणि लिकटेंस्टीन. हे चार देश 15 ऑगस्ट रोजीच स्वतंत्र झाले होते. दक्षिण कोरियाला जपानकडून 15 ऑगस्ट 1945, बहरीनला ब्रिटनकडून 15 ऑगस्ट 1971, कांगोला फ्रान्सकडून 15 ऑगस्ट 1960 आणि लिकटेंस्टीनला जर्मनीकडून 15 ऑगस्ट 1866 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.
