आज बारामतीत कडकडीत बंद – eNavakal

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपा सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असाही आरोप बारामतीकरांनी केला आहे. बारामतीतील नागरिकांच्या वतीने हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आज सकाळी १० वाजता शारदा प्रांगण बारामती या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर धुमाळ यांनी सोशल मीडियावरून केला आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप बारामतीतल्या नागरिकांनी केला आहे.

दरम्यान मला यासंदर्भातली माहिती नाही, असे म्हणत माझ्या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याचमुळे ही कारवाई केली गेल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

हवेली तालुक्यात अशीही अफवा, सिहगडच्या जंगलात कोरोना रुग्ण

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यात काही गावांमध्ये अशी अफवा पसरली की त्यामुळे ही गावे रात्रभर जागी राहिली. पुण्यातील रुग्णालयातून पळालेले ४-५ कोरोनाबाधित रुग्ण सिहगडच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मृतांचे आकडे कमी करण्यासाठी सरकारने नेमली उच्चस्तरिय समिती

मुंबई – लॉकडाऊन असूनही मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे एकीकडे नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. तर दुसरीकडे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. हे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्ण शिथिल होणार नाही

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊन संपायला ७ दिवसांचा कालावधी...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनचा फज्जा, चौपाटीवर नागरिकांची गर्दी

भाईंदर – ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहतील, गर्दी करू नका’, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More