आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली जाणार आहेत. यासाठी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (28) रोजी पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. पाणी बंद असणार्‍या भागास त्या-त्या दिवशी नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More