आज पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक – eNavakal
मुंबई वाहतूक

आज पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज, रविवार 11 ऑगस्ट 2019 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी-बांद्रा डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी-बांद्रा-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी-वडाळा रोडवरून सकाळी 11.34 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत वाशी, बेलापुर, पनवेल येथे जाणार्‍या तर सीएसएमटी येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.16 वाजेपर्यत बांद्रा, गोरेगावच्या दिशेने जाणार्‍या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहणार आहेत. तसेच ब्लॉक काळात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्‍चिम रेल्वे आणि मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

‘परे’वर जम्बोब्लॉक
रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर आज रविवार 11 ऑगस्ट, 2019 रोजी सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 वा.पासून ते दुपारी 03.35 वा.पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकलना सांताक्रुझ-गोरेगांव स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More