आज देशातील 25 कोटी कामगारांचा ‘भारत बंद’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आज देशातील 25 कोटी कामगारांचा ‘भारत बंद’

नवी दिल्ली – देशातल्या मोठ्या कामगार संघटना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी ‘बंद’ची हाक दिली आहे. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होणार आहे. बँक कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने  ATM सेवेवर मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत. देशातल्या 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. 25 कोटी कर्मचारी आणि कामगार या बंदमध्ये सहभागी होतील, असे या संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत आहोत, असे या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध सेवांवर या संपाचा मोठा परिणाम जाणवणार आहे. तसेच बंदमुळे नेटबँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस, इत्यादी ऑनलाइन सुविधांना मात्र फरक जाणवणार आहे. बँकिंग सुधारणा, बँकांचे विलीनीकरण याचा निषेध म्हणून हा संप करण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीच्या प्रमुख मागणीचाही यात समावेश आहे. यासोबत 5 दिवसांचा आठवडा, नव्या कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती आणि त्यामुळे कामावर येणार ताण या सगळ्या मागण्यांसाठी बँकेतील कर्मचारी एक दिवसाच्या संपात सहभागी झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More