आजारामुळे भुजबळ जे जे रुग्णालयात दाखल – eNavakal
अन्य मुंबई

आजारामुळे भुजबळ जे जे रुग्णालयात दाखल

मुंबई-महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांना झोपही न आल्याने त्यांना वाताचा त्रास जाणवू लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून येत्या २८फेब्रुवारी रोजी त्यांच्या अर्जावर सुनावणी अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील काही कलमे रद्द करण्याचे आदेश दिले हाेते. त्याअाधारे भुजबळांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांच्या जामिनाला विरोध केल्याने विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी राज्यभर अांदाेलन सुरू केले अाहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

चंद्राबाबूंच्या भेटी सुरूच! पवार, राहुलशी पुन्हा चर्चा

नवी दिल्ली- या सतराव्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला अथवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार नाही याची पूर्वकल्पना देशातील राजकीय धुरंधरांना आली आहे. या धुरंधरांपैकी...
Read More
post-image
News विदेश

होंडूरासमध्ये विमानाला अपघात! चार जणांचा मृत्यू

तेगूसिंगल्या – होंडूरासच्या रोआतन बंदराजवळील (डिक्सन कोव )समुद्रात एक विमानाचा अपघात झाल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला. त्यातील तीन नागरिक पर्यटनासाठी आले होते. हे विमान...
Read More
post-image
News महाराष्ट्र

खंबाटकी घाटालगत ट्रक-बोलेरोच्या अपघातात तीन ठार! दोन गंभीर

सातारा – सातार्‍याच्या खंबाटकी घाटालगत असलेल्या हॉटेल पार्क इन सहारा समोर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला सातारा बाजूकडून येणार्‍या बोलेरो जीपने पाठीमागून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

प्रज्ञा सिंहला पक्षातून काढून टाका, नितीशकुमार यांची भाजपाकडे मागणी

भोपाल – हिंदी भाषिक पट्ट्यातील भाजपाचा एकमेव मित्रपक्ष असलेल्या जनता दल संयुक्तचे भाजपाशी असलेले संबंध बिनसले आहेत. जदयूचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

(Live) #Elections2019 दुपारी १ वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज ५९ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 8 राज्यांमध्ये 59 जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 23...
Read More