#FifaWorldCup2018 आजपासून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार – eNavakal
क्रीडा विदेश

#FifaWorldCup2018 आजपासून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार

मॉस्को – फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेची आणि प्रथम क्रमांकाच्या ओळखल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून रशियात प्रारंभ होत आहे. प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असलेल्या रशियाची राजधानी मॉस्को ही या स्पर्धेसाठी एखाद्या नववधूप्रमाणे सज्ज झाली आहे. मॉस्को शहर विविध रंगामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने न्हाहून गेले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी या स्पर्धेचे यजमनापद प्रतिष्ठेचे केले आहे. स्पर्धेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून त्यासाठी एक लाख सुरक्षा रक्षक विविध स्टेडियममध्ये नियुक्ती करण्यात आले आहे.

चीनने ज्याप्रमाणे बीजिंग ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले होते, त्याप्रकारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे रशियालादेखील यशस्वी आयोजन करायचे आहे. याअगोदर रशियाने हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे दमदार आयोजन केले होते. स्पर्धेतील सामन्याचे कवरेज करण्यासाठी जगभरातून एक हजारपेक्षा जास्त पत्रकार आणि छायाचित्रकार दाखल झाले आहेत. मॉस्को येथे स्पर्धेचा उद्घाटन आणि समारोप समारंभ रंगणार आहे. मॉस्को येथील प्रख्यात लुजनिकी स्टेडियममध्ये सलामीचा आणि समारोपाचा सामना होईल. एकूण 12 सामने या स्टेडियमध्ये होतील. या स्पर्धेच्या निमित्ताने रशिया देश फुटबॉलमय झाला असून, विविध दुकानामध्ये फुटबॉलचे साहित्य आणि विविध राष्ट्राचे ध्वज लक्षवेधून घेत आहे. यंदाच्या या स्पर्धेचे थिम सॉग ‘लिव्ह इट अप’ हे असणार आहे.

विश्वचषक स्पर्धेचा एक भाग म्हणून ‘रेड स्केअर’ जवळ लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे. मॉस्कोतील उंच इमारतींवर विश्वचषकांची होर्डिंग्स झळकताना दिसत आहे. प्रसिद्ध मनेगी संग्रहालयापुढे विश्वचषक स्पर्धेच्या संबंधित विविध वस्तू सजवण्यात आल्या आहेत. मेस्सी, रोनाल्डो, नेयमार, सालह, म्युलर, यांच्या कामगिरीकडे तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. आपली शेवटची स्पर्धा खेळणारे दिग्गज मेस्सी अथवा रोनाल्डो आपल्या देशाला एकहाती ही स्पर्धा जिंकून देतात का? याकडे आता तमाम चाहत्याचे लक्ष आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रथमच बॉल बॉयजचे काम करताना 14 रशियन मुली प्रथमच दिसणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटनच्या सामन्यात बॉल बाईजची भूमिका प्रथम मुली करणार आहेत. स्पर्धेतील 64 सामन्यासाठी एकूण 766 मुला-मुलींची बॉल बाईज म्हणून निवड करण्यात आली आहे. 32 संघात जेतेपदासाठी जोरदार चुरस होईल. यजमान रशियाचा संघ ‘अ’ गटात असून ते आपली सर्वोत्तम कामगिरी यंदा करतील, असा विश्वास त्यांच्या तमाम चाहत्यांना आहे. या गटात रशियाला सौदी अरेबिया, इजिप्त आणि उरुग्वे यांच्याशी मुकाबला करायचा आहे. ‘अ’ गटातील रशियाविरुद्ध सौदी अरेबिया यांच्यातील लढतीने स्पर्धेचा शुभारंभ होईल. विजेत्या संघाला 225 कोटीं रुपयाचे घसघशीत इनाम मिळेल. तसेच 18 कॅरेट सोन्याचा चषकदेखील मिळणार आहे. ब्राझीलने सर्वाधिक 5 वेळा ही स्पर्धा जिंकली असून, त्यांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी गतविजेत्या जर्मनीला आणखी एका जेतेपदाची गरज आहे. ब्राझीलच्या विक्रमाची जर्मन संघ बरोबरी करतो का? हेदेखील या स्पर्धेचे वैशिष्टय ठरणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

नांदेडातील ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश; घोटाळ्यातील निवड यादी रद्द

नांदेड – नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़. घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर घेतलेली लेखी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून ग्रेनेड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More