आजपासून रामजन्मभूमी वादावर दररोज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी – eNavakal
देश न्यायालय

आजपासून रामजन्मभूमी वादावर दररोज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली- बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्याच्या घटनेला येत्या 6 डिसेंबर रोजी 25 वर्षे होतील. त्याच्या आदल्या दिवशीच आजपासून सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या संदर्भात सुनावणी सुरू होणार आहे. याविषयी दाद मागणाऱ्या विविध याचिकांवर एकत्रितपणे व दररोज सुनावणी होईल. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता आहे

अयोध्या प्रश्‍नाच्या मुळाशी 2.77 एकर भूखंडाच्या मालकीहक्काबाबतचा वाद आहे. ज्या भूमीवर उद्‌ध्वस्त झालेली वास्तू उभी होती, त्या भूमीच्या मालकी हक्काचा मूळ वाद आहे. या वादावर निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सामोपचाराने वाद मिटविण्याच्या दृष्टीने 2.77 एकर जागेचे तीन पक्षकारात समान वाटप करण्याचा निर्णय दिला होता आणि त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

अयोध्या आणि बाबरी मशिद वादाच्या प्रकरणात मुळ कागदपत्रे आणि दस्तावेज हे संस्कृत, पारशी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये आहेत. ९ हजार पानांचे दस्तावेज, पाली, संस्कृत, अरब या भाषांसह विविध भाषांमध्ये जवळपास 90 हजार पानांमध्ये जबाब नोंदवण्यात आले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तावेजांचे भाषांतर करण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी दिला होता. त्याचीच सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होईल. यासंबंधी जो निर्णय होईल, त्याआधारेच रामजन्मभूमी-बाबरी मशीद विवादावर तोडगा निघणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More