आजपासून राज्यात प्राणिगणना, ताडोबात 50 मचाण तयार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आजपासून राज्यात प्राणिगणना, ताडोबात 50 मचाण तयार

नागपूर –  जंगलातील प्राण्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यभरातील जंगलांमध्ये आज ’मचाणावर’ची गणना होणार आहे. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणार्‍या या गणनेसाठी वनाधिकार्‍यांनी पाणवठ्यांचे नियोजन केले असून, प्राणिप्रेमी आणि अभ्यासक विविध जंगलांमध्ये दाखल झाले आहेत.
उन्हाळ्यामध्ये जंगलात मोजकेच पाणवठे शिल्लक असतात, त्यामुळे प्राण्यांच्या हालचाली या ठिकाणी टिपणे सहज शक्य असते. त्यातच बुद्धपौर्णिमेला सर्वाधिक प्रकाश असतो त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणिप्रेमी, अभ्यासक रात्रभर या पाणवठ्यांशेजारी मचाण बांधून अथवा लपणात बसतात. अभयारण्यात एकाच वेळी सर्व पाणवठ्यांवर ही गणना सुरू असते. यावेळी पाणी पिण्यासाठी येणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या नोंदी घेतल्या जातात. गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक उपकरणांद्वारे अचूक माहितीसाठी नव्या पद्धतीने गणना सुरू झाली असली, तरी आजही या पद्धतीने गणना करण्यात येते आहे. सर्व अभयारण्यांमध्ये आज सायंकाळी चार ते दुसर्‍या दिवशी सकाळी आठ या वेळेत गणना करण्यात येणार आहे. याशिवाय, वनकर्मचारी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साह्याने प्राण्यांचे ठसे आणि विष्ठेचे पुरावेदेखील गोळा करणार आहेत. 18 आणि 19 मे रोजी होणार्‍या या प्राणिगणनेसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे 50 मचाण तयार करण्यात आले आहेत.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात हा निसर्गानुभव कार्यक्रम राबविला जाईल. नागपूरनजीकच्या पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या पवनी आणि नागलवाडी अशा दोन ठिकाणी मचाण निरीक्षणाचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी 22 मचाणांची सिद्धता वनविभागाने केली आहे. दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने केली जाणारी प्राणिगणना हा वनप्रेमींचा आवडता उत्सव असतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More