आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असल्यामुळे या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या विंडीज दौर्‍यात टी-20, वनडे आणि कसोटी मालिका जिंकण्याचा आगळा पराक्रम विराट कोहलीच्या भारतीय संघाने केला होता. आता आफ्रिकेविरुद्धदेखील भारताला टी-20 मालिकेत विजय मिळविणे फारसे जड जाऊ नये. कागदावर तरी घरच्या मैदानावर खेळणार्‍या भारतीय संघाचे पारडे चांगलेच जड आहे. आफ्रिकेचा काहीसा नवखा संघ भारताशी दोन हात करणार आहे. तर भारतीय संघ मात्र पूर्ण ताकदीनिशी या मालिकेत उतरणार आहे.

आतापर्यंत भारताला आफ्रिकेविरुद्ध एकही टी-20 सामना भारतात जिंकता आला नाही. त्यामुळे ही मालिका जिंकून भारतीय संघ नवा इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे. भारतात झालेले 6 पैकी 4 टी-20 सामने आफ्रिकेनेच जिंकले आहेत. उभय संघात 2015 मध्ये झालेली शेवटची टी-20 मालिका भारतामध्ये आफ्रिकेनेच जिंकली होती. गेल्या 5 टी-20 लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. तर एक सामना होऊ शकला नव्हता. सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेत नवेनवे विक्रम करण्याची संधी आहे. यष्टिरक्षक डिकॉक प्रथमच या मालिकेत आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. आयपीएल स्पर्धेतील खेळण्याचा फायदा डिकॉकला या मालिकेत उपयोगी पडू शकतो.
भारताविरुद्ध 4 टी-20 सामन्यांत त्याने 153 धावा केल्या आहेत. तर आयपीएल स्पर्धेत मुंबईतर्फे खेळणार्‍या डिकॉकने 500 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज रबाडावरदेखील त्यांची मोठी मदार असेल. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये काही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांत रबाडाचा समावेश होतो. 24 वर्षीय रबाडाने तीनही प्रकारच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीचा चमकदार ठसा उमटविला आहे.

आयपीएल स्पर्धेत दिल्लीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या रबाडाने 25 बळी घेतले होते. त्यालादेखील डिकॉकप्रमाणे आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा फायदा होईल. डुप्लिसीस, आमला, स्टेन, ताहिर यांची गैरहजेरी आफ्रिकेच्या संघाला नक्कीच जाणवेल. अष्टपैलू डेविड मिलरकडून त्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील. युवा फलंदाज बाऊमा आणि नोर्टेजे
हेदेखील या मालिकेत कशी फलंदाजी करतात याकडे आफ्रिकेच्या चाहत्यांचे लक्ष असेल.

विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताला 20 टी-20 सामने खेळायला मिळणार आहेत. त्या सामन्यांत आगामी विश्वचषक स्पर्धेची संघबांधणी शास्त्री आणि विराटला करावी लागणार आहे. कर्णधार विराट, रोहित शर्मा, शिखर धवन, राहुल, पांड्या, जडेजा यांच्यावर फलंदाजीची मोठी मदार असेल. तर गोलंदाजीत दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांना गोलंदाजीचा भार हलका करावा लागेल. बुमराह, शमी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांच्या गैरहजेरीत खलील अहमद, नवदीप सैनी यांच्यावर वेगवान गोलंदाजीचा मोठा भार असेल. युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतला या मालिकेत चांगली फलंदाजी करून विंडीज दौर्‍यातील अपयश पुसून काढता येईल.

अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन, श्रेयश अय्यर, कुणाल पांड्या या तिघांमध्ये भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस असेल. काही दिवसांपूर्वी येथे पडलेल्या पावसामुळे खेळपट्टीत थोडेफार पाणी गेले असल्यामुळे ती वेगवान गोलंदाजांना साथ देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसामुळे खेळपट्टी आणि मैदान तयार करण्यात फारसा वेळ ग्राऊंड स्टाफला मिळालेला नाही. त्यामुळे ही खेळपट्टी कोणाला साथ देणार याचे चित्र सामना सुरू झाल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More