#INDvAFG कसोटी : सामन्यात पावसाने खोळंबा – eNavakal
क्रीडा देश

#INDvAFG कसोटी : सामन्यात पावसाने खोळंबा

बंगळुरू – आजपासून येथे यजमान भारत आणि पाहुणा अफगाणिस्तान क्रिकेट संघ यांच्यातील ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात २४८ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र काही वेळातच चिन्नास्वामी मैदानावर पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे.

काही महिन्यांपूवीच आयसीसीने आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघाला कसोटी सामन्याचा दर्जा दिला होता. तो दर्जा दिल्यानंतर आयर्लंड संघ पाकिस्तानशी आपला पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात आयर्लंड संघाला हार खावी लागली होती. आता त्यानंतर आज भारताविरुद्ध अफगाणिस्तान संघ आपला पहिला ऐतिहासिक कसोटी सामना खेळत आहे. भारताचा शैलीदार डावखुरा सलामीवीर शिखर धवनने ८७ चेंडूत तडाखेबंद शतक ठोकले आहे. आपल्या या वेगवान शतकी खेळीमध्ये धवनने अफगाणिस्तानच्या नवख्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत १९ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले.  दरम्यान दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या मुरली विजय याने चिवट फलंदाजी करून धवनला चांगली साथ दिली. अखेरचे वृत्तहाती आले तेव्हा भारताने २७ षटकांमध्ये बिनबाद १५८ धावांची दमदार सलामी दिली आहे. १०७ धावा काढून शिखर धवन माघारी परतला. यामिन अहमदजाईच्या गोलंदाजीवर मोहम्मद नाबीने झेल पकडला.

शतकवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर मुरली विजय आणि लोकेश राहुल जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र यानंतर सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर खेळ थांबवावा लागला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यात पावसाचा खेळ थांबल्यानंतर, सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात २४८ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र काही वेळातच चिन्नास्वामी मैदानावर पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

आता इंस्टग्रामवरून शॉपिंग करता येणार

नवी दिल्ली – इंस्टग्राम या सध्याच्या लोकप्रिय अॅपने निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या...
Read More