आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास ‘या’ अ‍ॅपवर तक्रार करा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास ‘या’ अ‍ॅपवर तक्रार करा

नवी दिल्ली – आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल’ हे अ‍ॅप लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोअर वरून ‘सीव्हिजिल’ अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे.

देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून १० मार्चपासून सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल’ हे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या साहाय्याने तक्रारदाराला फोटो किंवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड करून आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देता येईल. या अ‍ॅपच्या माध्यमाने तक्रार करणाऱ्या व्यक्तींचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. तसेच  अ‍ॅपद्वारे आलेली तक्रार योग्य असेल, तर 100 मिनिटांत तिचे निवारण होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More