आग दुर्घटनेनंतर मीरा भाईंदर पालिकाही जागृत – eNavakal
News मुंबई

आग दुर्घटनेनंतर मीरा भाईंदर पालिकाही जागृत

मिरा-भाईंदर –मुंबईतील कमला मील कंम्पाउंड मध्ये आग लागल्या नंतर मिरा- भाईंदर महानगर पालिका आता खडबडून जागी झाली आहे. मिरा-भाईंदर येथील नियमांचे उलंघन करणार्‍या हॉटेल, बार आणि लॉजला महानगर पालिके कडून नोटीसा बजावण्यात आल्या आहे. खुल्या जागेतील थर्टीफस्टच्या पार्ट्यांसाठी तसेच लॉज, ऑर्केस्ट्रा, बार, बार व रेस्टोरंट ना नोटीसा बजावुन अग्नशिमन दलाची परवानगी बंधनकारक केली आहे. अग्नीशामक यंत्रणा नसल्यास कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिलाय. तसे असले तरी यंत्रणेची तपासणी आदींचे काटेकोर पालन करणे अवघड असुन आग सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे.

निवासी जिल्हाधिकारी यांच्या पत्रा नंतर पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मुख्य अग्नीशमन अधिकारी प्रकाश बोराडे, उपायुक्त मुख्यालयय विजयकुमार म्हसाळ, अतिक्रमणचे सर्व सहाय्य आयुक्त तथा प्रभाग अधिकारी यांना संयुक्त कारवाई करायचे आदेश दिले आहेत. उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी कार्यालया कडुन थर्टीफस्ट साठी परवानगी दिलेल्या आस्थापनांची यादी मिळवा. त्या ठिकाणी अग्नीशमन प्रतिबंधक व्यवस्थेची पुर्तता केल्याची खात्री करावी. काही अयोग्य आढळल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ३७६ ( अ ) नुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More