आगामी विद्यापीठ निवडणूकीत शिवसेना आणि अभाविप पुन्हा आमने-सामने – eNavakal
निवडणूक मुंबई

आगामी विद्यापीठ निवडणूकीत शिवसेना आणि अभाविप पुन्हा आमने-सामने

मुंबई – नुकत्याच झालेल्या विद्यापीठ निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेला यश मिळाल्या नंतर आता पुन्हा एकदा शिवसेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आमने सामने येणार आहेत. या वेळी निवडणूकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) देखील असल्याने सर्वांचेच लक्ष तेथे लागून राहिले आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक गेल्या आठवड्यात झाली होती. त्यावेळी या निवडणूकीत अध्यक्ष व सचिव या दोन्ही पदांवर युवा सेनेचे उमेदवार निवडून आले होते. दर निवडणूकीत अध्यक्ष व सचिव हे अधिसभेचे पदसिद्ध सदस्य निवडून येतात. अधिसभेत दोन प्रतिनिधींचा प्रवेश झाल्याने युवा सेनेचा विश्वास वाढला आहे.  ही निवडणूक जिंकण्यासाठी युवा सेना व अभाविपने जोरदार मोर्चेंबांधणी केली होती. अभाविपचे माजी कार्यकर्ते असलेले विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या निवडणुकित लक्ष घातले असल्याचे बोलले जात होते.

आता विद्यार्थी चळवळीमध्ये अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या अधिसभेच्या पदवीधर जागांची निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची बनविण्यात आली आहे. या १० जागा जिंकून आणण्यासाठी अभाविप व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षभरापूर्वीच मतदारांचे अर्ज भरून आपली मतदान संख्या जास्तीची राहिल याची काळजी घेतली आहे. त्यामुळे २५ मार्च रोजी होऊ घातलेली निवडणूक अटीतटीची होईल, असे युवा राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत युवा सेनेचे ८ व मनविसेचे दोन उमेदवार निवडून आले होते. अभाविपला एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. त्यामुळेच मागील अपयश धुवून काढण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते जोरदार तयारी करीत आहेत, तर युवा सेनेने आपल्या ८ जागा पुनश्चः मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. `आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकांची चांगली तयारी झाली आहे. सर्वच्या सर्व १० जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे` युवा सेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Bhanushali building collapse: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महापौर, गृहनिर्माण मंत्री घटनास्थळी दाखल

मुंबई – मालाडच्या मालवणी परिसरात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता पुन्हा फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.या इमारतीचं पूनर्बांधणीचं काम सुरू असल्याची...
Read More