आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डहाणूत भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न – eNavakal
News महाराष्ट्र

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डहाणूत भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

डहाणू – वन बूथ ट्वेंटी फाइव्ह युथ घेऊन गाव पातळीवर सामान्य मतदारपर्यंत गेले पाहिजे व आपल्या सरकारच्या योजना व केलेली कामे सांगितली पाहिजे तरच पुढील निवडणुका जिंकता येईल, असा विश्वास भाजपचे विभागीय संघटन मंत्री सतिश धोंड यांनी रविवारी डहाणू येथे पार पडलेल्या पालघर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना केला.
आगामी 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा आज डहाणू लोहाणा हॉल येथे पार पडला. यावेळी राजेंद्र गावित व विष्णुजी सावरा यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उधव्याचे सरपंच सुरेश शिंदा यांचा आदिवासी विकासमंत्री व खासदार यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यवेळी नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सरकार आपले,मंत्री आपले,खासदार आमदार आपले तरीही अधिकारी आमचे ऐकत नाहीत अशी खंत व्यक्त केली.
या बैठकीस आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व आमदार पास्कल धणारे, विभागीय संघटन मंत्री सतिशजी धोंड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, नगराध्यक्ष भरत राजपूत इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,
या बैठकीस मोठ्या संख्येने पदाधिकारी,नगरसेवक,सरपंच तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख उपस्थितीत होते.सूत्र संचलन संतोषजी जनाठे यांनी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More