आई-वडिलांची भेटही नाही; दहशतवाद्यांनी ठारचं केले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आई-वडिलांची भेटही नाही; दहशतवाद्यांनी ठारचं केले

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ‘नापाक’ कुरापती सुरूच आहेत. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आई-वडिलांना भेटण्यास निघालेल्या मीर यांनी दहशतवाद्यांना चकमा देण्यासाठी आपली दाढीही काढली होती. पण असंवेदनशील दहशतवाद्यांनी पुलवामातील वहीबाग परिसरात गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष केले आहे. मीर यांना घरी न जाण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ला करू शकतात, याची कल्पना मीर यांनी देण्यात आली होती. अनेक दिवसांपासून ते आपल्या आई-वडिलांची भेट घेऊ शकले नव्हते. त्यामुळे पेहराव बदलल्यास दहशतवादी आपल्याला ओळखू शकणार नाहीत, असे त्यांना वाटले होते. पण लवामातील वहीबाग परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. मीर हे जम्मू-काश्मीर पोलीस दलात सीआयडी विभागात कार्यरत होते. गेल्यावर्षी त्यांची कुलगाम येथे बदली झाली होती. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये त्यांची सीआयडीमध्ये बदली करण्यात आली होती.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More