सिंधुदुर्ग – आंबेनळी घाटात बसचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता आंबोली घाटात ट्रक दरीत कोसळला आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोल्हापूर- बेळगाव जोडणाऱ्या आंबोली घाटात पाचशे फुट खोल दरीत आज सायंकाळी सहा वाजता ट्रक कोसळला. आंबोलीतील तरुणांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. कठडा तोडून हा ट्रक दरीत पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आंबोली घाटातून ट्रक सावंतवाडीवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. त्यादरम्यान घाटातील वळणावर कठडा तोडून ट्रक दरीत कोसळला. संध्याकाळ झाल्याने अंधारामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. ट्रकमध्ये कोण कोण होते याचा तपास अद्याप सुरु आहे. ट्रकचा अक्षरशः चुरा झाला आहे. सावंतवाडी पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी मदतकार्य सुरू असल्याची माहीती दिली