आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी – eNavakal
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी मागितली आहे.

कोकण कृषी विद्यापीठाची सहलीची बस 28 जुलै 2019 रोजी आंबेनळी घाटात कोसळली होती. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातातून प्रकाश सावंत-देसाई हे एकटे बचावले होते. त्यांच्यावर मृतांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र त्यांची कुठलीही चौकशी न करता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील पत्र न्यायालयाने स्वीकारले आहे.

पोलिसांनी कोकण कृषी विद्यापीठाचे चालक प्रवीण भांबेड यांनी बेदरकारपणे गाडी चालवल्याचा दावा न्यायालयात केला आहे. प्रवीण भांबेड यांचाही या अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. मात्र पोलिसांच्या या पावित्र्यामुळे अपघातातील मृतांचे नातेवाईक नाराज झाले आहेत. हे नातेवाईक अपघातातून एकमेव बचावलेले प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी आजही करत आहेत. पोलीस तपास थांबवला जाऊ नये अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. या अपघातासंदर्भात तब्बल सहा महिन्यानंतर पहिला गुन्हा दाखल झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी आज रविवार, 18 ऑगस्ट 2019 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More