आंबेडकर जयंती मिरवणुकीत दोन भावांकडून एकाची हत्या – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र

आंबेडकर जयंती मिरवणुकीत दोन भावांकडून एकाची हत्या

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान एका तरुणाची क्षुल्लक कारणावरून दोघा सख्ख्या भावांनी गुप्तीने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील क्रांती चौकात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. आशिष संजय साळवे (27) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी या घटनेप्रकरणी अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव या सख्ख्या भावांवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्यापासून दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी एका लग्नाच्या वरातीत या दोघा भावांचे मृत आशिषबरोबर भांडण झाले होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी काल मिरवणुकीदरम्यान आशिषला गुप्तीने भोसकले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर संतप्त जमावाने या आरोपींच्या घरावर दगडफेक केली. मृत आशिष साळवे शहरातील रामनगर परिसरात राहत होता.

नांदेडात बाबासाहेबांच्या  बॅनरजी विटंबना
काल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी काही अज्ञातांनी बॅनरजी विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेनंतर नांदेड शहराजवळच्या विष्णूपुरीमध्ये रास्तारोको करण्यात आला. विटंबना करणार्‍या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. एका ठिकाणी बसवर दगडफेक झाल्याची घटनाही उघडकीस आली. बाबासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली होती. नांदेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More