आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू मुलासह नजरकैदेत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू मुलासह नजरकैदेत

हैदराबाद – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या तेलगू देसम पक्षाने आंध्रातील जगनमोहन रेड्डी सरकारविरुद्ध आज अत्माकुर येथे भव्य सभेचे आयोजन केले होते. मात्र त्यापूर्वीच काल रात्री चंद्राबाबू नायडू यांना त्यांचा मुलगा नारा लोकेश याच्यासह त्यांच्या  घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

चंद्राबाबू नायडू आजपासून जाहीर सभा घेऊन उपोषणाला बसणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या घराला पोलिसांचा वेढा पडला. उपोषणाला जाण्यासाठी गाडीत बसलेल्या चंद्राबाबूंना गाडीतच अटक करून नंतर घरात स्थानबद्ध करण्यात आले. मुलगा लोकेश नारा यालाही स्थानबद्ध करण्यात आले. पलनाडू येथे तेलगू देसम पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमले होते. त्यांनाही पोलिसांनी तिथेच अडविले.

जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री होताच त्यांनी सर्वप्रथम चंद्राबाबूंची विशेष सुरक्षा काढली. चंद्राबाबू यांनी गोदावरी नदीतीरावर बांधलेला ‘प्रजा वेदिका’ बंगला जगनमोहन यांनी जमीनदोस्त केला. तेलगू देसम पक्षाचे आठ कार्यकर्ते वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारले गेले. या कारवायांविरोधातच चंद्राबाबू हे आजपासून उपोषणाला बसणार होते. त्यापूर्वीच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More