आंदोलन थांबल्यावर सरकार आरक्षण देईल – राणे – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आंदोलन थांबल्यावर सरकार आरक्षण देईल – राणे

मुंबई –  मराठा समाजाच्या आंदोलकांनी नारायण राणे यांची भेट घेतली.  यावेळी आंदोलकांनी राणे समितीच्या अहवालाची अमलबजावनी करण्यात यावी अशी मागणी केली.  यावर आपण आज नाहीतर उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे राणे म्हणाले.  तसेच, आंदोलन थांबल्यावर सरकार आरक्षण देईल.  तर मराठ्यांचा विश्वास बसेल असा निर्णय मुख्यमंत्री घेतील असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील चार दिवसापासून मराठा आंदोलनाने महाराष्ट्रात भडका उडाला  आहे.  मात्र तरीही सरकारची भूमिका स्पष्ट होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांनी महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि  खासदार नारायण राणे यांची भेट घेतली.  यावेळी या संघटनांनी राणे अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली.  या संदर्भाची माहिती देण्यासाठी आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलले कि,  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंबंधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण द्यायला तयार आहे.  तसेच मी मराठा समाजाच्या नेत्यांनाही भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, आता आज नाहीतर उद्या पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडणार आहे. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, जाळपोळ, तोडफोड यामुळे राज्याचे आणि आंदोलनकर्त्यांचे नुकसान होत आहे  या सगळ्या घटना थांबल्या पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनाहि वाटत असल्याचे राणे म्हणाले,   येत्या दोन दिवसात मराठा नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट मी घडवून आणेन आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्यास मध्यस्थी करणार असल्याचे राणेनी यावेळी स्पष्ट केले तर सरकारने मागील चार वर्षात काहीच केले नसल्याचा टोला राणेंनी यावेळी सरकारला लगावला.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More