आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 30 खोल्यांचे अनधिकृत हॉटेल तोडले – eNavakal
News मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 30 खोल्यांचे अनधिकृत हॉटेल तोडले

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर गेल्या काही महिन्यांपासून एक अनधिकृत बांधकाम उभे राहत होते. 30 खोल्या
असणार्‍या व 10 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आकार असणार्‍या या बांधकामाचा वापर निवासी हॉटेल पद्धतीने होण्याची शक्यता होती, मात्र विमानतळाजवळ अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम असणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते. हे लक्षात घेत पालिकेच्या परिमंडळ-3चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्या बांधकामावर तोडकाम कारवाई सुरू करण्यात आली, मात्र ते बांधकाम करणार्‍यांनी बाऊन्सर आणून पालिकेच्या पथकाचा रस्ता अडविला. त्यानंतर मुंबई पोलीस दलाचे उपायुक्त सुनील कुंभारे यांनी विशेष सहकार्य करीत पालिकेच्या पथकाला आणि कार्यवाहीला संरक्षण देण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तत्काळ पाठविला. यानंतर अवघ्या 12 तासांत पालिकेच्या पथकाने ते तीन मजली बांधकाम जमीनदोस्त केले, तर कार्यवाहीला विरोध करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यासह दोन इसमांना अटकही झाली, अशी माहिती के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.

अंधेरी पूर्वमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणार्‍या ‘सहार व्हिलेज’ परिसरातील सुतार पाखाडी भागात नगर भूमापन क्रमांक 129 (पॉइंट) व 130 (पॉइंट) या भूखंडावर तीन मजली इमारत अनधिकृतपणे बांधण्यात येत होती. या भूखंडावर गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई पालिकेद्वारे एमएमआरडीएला वेळोवेळी कळविण्यात आले होते, तथापि काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएच्या स्थानिक अधिकार्‍यांनी सदर सीटीएस क्रमांक हा त्यांच्या अखत्यारित येत नसल्याचे व सदर बाबत पालिकेद्वारे कारवाई करण्याचे कळविले. त्यानंतर पालिकेद्वारे सदर बांधकामास स्टॉप वर्क नोटीस देण्यात आली. तसेच न्यायालयात कॅव्हेटदेखील दाखल करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

आसाममध्ये भूकंपाच्या धक्क्याने घबराट

गुवाहटी – मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत अडकलेल्या आसाममध्ये आज दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २.५१ वाजता झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी होती....
Read More
post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More