आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला 17 पदके – eNavakal
क्रीडा देश विदेश

आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला 17 पदके

सुबोटिका – सर्बियातील सुबोटिका येथे संपन्न झालेल्या 36 व्या गोल्डन ग्लोव वोजवोदिना युवा आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करताना 17 पदकांची कमाई केली. त्यामध्ये 7 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताने पदक तालिकेत देखील अव्वल क्रमांक पटकावला. भारताने 6 सुवर्ण, 6 रौप्य, 4 कास्यपदके जिंकली. रशियाचा दुसरा क्रमांक लागला. तर कझाकिस्तानने तिसरा क्रमांक मिळवला.

भारताच्या अमन (91 किलो) आकाश कुमार (56 किलो) एस. बरुन सिंह (49 किलो) आणि विजय दीप (69 किलो) यांनी पुरुष गटात सुवर्णपदके जिंकली. तर महिला विभागात नीतू (48 किलो), दिव्या पवार (54 किलो) आणि ललिता (69 किलो) यांनीदेखील अव्वल क्रमांक मिळवला. अमनला या स्पर्धेत दोनच लढती खेळाव्या लागल्या. अंतिम फेरीत त्याने हंगेरीच्या लाजलो फेलफोल्डीचा 5-0 गुणांनी आरामात पराभव केला. तर बरुणने जोकसिमोविचलादेखील 4-1 गुणांनी सहज नमवले. आकाशने अर्जेंटिनाच्या जेहेलला चुरशीच्या लढतीत 3-1 गुणांनी पराभूत केले. तर विजय दिपला देखील सुवर्णपदक जिंकताना बरीच मेहनत करावी लागली. त्याला कझाकिस्तानच्या असानोव विरुद्ध 3-2 गुणांनी विजय मिळवता आला. महिला विभागात नीतूने स्कॉटलंडच्या बिलीव 50 गुणांनी आरामात विजय मिळवला. तर दिव्याने सर्बियाच्या दाजाणावर सहज विजय मिळवला. ललिताने रशियाच्या एंजलिनाला पराभूत केले. जागतिक युवा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ज्योतीला मात्र 51 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चुरशीच्या लढतीत इटालीच्या मार्टिनाकडून ती पराभूत झाली. 64 किलो वजनी गटात मनिषादेखील रशियाच्या लानाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाली. साक्षी, भावेश, अनामिका, यांना उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यामुळे कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More