अ, आ, अॅ, ऑ…..आता चौदाखडी – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

अ, आ, अॅ, ऑ…..आता चौदाखडी

औरंगाबाद  -अ, आ, अॅ, ऑ ऐकून थोडा वेगळ वाटेल मात्र आता बाराखडी चौदाखडी झाली आहे. आता बाराखडी 12 अक्षरांची न राहता 14 अक्षरांची झाली आहे. म्हणजेच चौदाखडी झाली आहे.महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पहिलीपासून शिकवल्या जाणाऱ्या मराठी भाषेतील बाराखडी वर्णमालेत बदल केला. यापुढे मुलांना बाराखडीऐवजी चौदाखडी शिकवली जाणार आहे. मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत ‘अॅ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून, त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली. इयत्ता पहिली ते पाचवीतील काही विद्यार्थ्यांना अजूनही वाचता येत नसल्याचे विविध संस्थांचे सर्वेक्षण आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आलं. त्यातच मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे काही नवीन नियमही तयार करण्यात आले. या चौदाखडीमुळे विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत शंभर टक्के वाचता येईल, असा दावा केला आहे. यासाठी मुलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम’ तयार केला आहे.

‘अ’ ते ‘औ’च्या बाराखडीत आता दोन नव्या स्वरांची भर घालण्यात आली आहे. सध्याच्या क्रमानुसारच्या ‘ओ’ स्वरानंतर ‘ऑ’ हा नवा स्वर येईल. त्यानंतर ‘औ’ हा स्वर येईल. ‘ए’ स्वरानंतर ‘अॅ’ या नव्या स्वराचा क्रम असेल आणि त्यानंतर ‘ऐ’ हा स्वर येईल. मराठीत बऱ्याचशा इंग्रजी संज्ञा येत आहेत. जसे की कॅट, सॉट आपण लिहितो. ‘क’ काढून त्यावर अर्धचंद्र द्यावा लागतो. त्यामुळे ‘अ’ व ‘ऑ’ असे स्वर स्वीकारले आहेत. त्यामुळे आता बारखडी ही चौदाखडी झाली आहे. या नव्या शैक्षणिक वर्षापासून ही चौदाखडी शिकवली जाईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More