अ‍ॅमेझॉनची होरपळ सुरूच! हजारो वन्यजीव जळून खाक – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

अ‍ॅमेझॉनची होरपळ सुरूच! हजारो वन्यजीव जळून खाक

ब्राझील – अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातलं जगातलं सर्वांत मोठं जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. जगाचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या ब्राझीलमधील या अ‍ॅमेझॉन जंगलात आगीने रौद्ररुप धारण केलं आहे. सलग १६ दिवस अमेझॉन आगीत होरपळत असून दिवसेंदिवस ही आग आणखी भडकत आहे. अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नसून आतापर्यंत तब्बल २७०० किमी क्षेत्राचा आगीने ताबा घेतला आहे. यात हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. तसेच इथे राहणाऱ्या 400 ते 500 आदिवासी जमातींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. युरोपियन युनियनच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या फोटोनुसार, आगीचा धूर संपूर्ण अटलांटिक किनाऱ्यावर पसरला आहे. ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गिनी या देशांमध्ये अमेझॉन जंगल पसरले आहे. सृष्टीला 20 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा या जंगलामुळे होतो.

ब्राझीलच्या अंतराळ संशोधन संस्थेने (आयएनपीई) 2013 मध्ये जंगलातील आगीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात आगी नोंदवण्यात आल्या आहेत. आयएनपीईच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये या वर्षात 72 हजार 843 आगीच्या घटना घडल्या. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त घटना अ‍ॅमेझॉन प्रदेशात घडल्या. या अ‍ॅमेझॉन जंगलाला वाचवण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियावर ‘#PrayforAmazonas हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिने याबाबत ट्विट केले असून ‘जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन असणारे, संपूर्ण जगाला २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करणारे, जगाचे फुप्फुस मानले जाणारे अ‍ॅमेझॉन वन गेल्या १६ दिवसांपासून आगीत होरपळत आहे, हा विचार करूनही भीती वाटते’, असे तिने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More