अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तन संदेशातून ऊर्जा घ्यावी! राहुल गायकवाडांचे प्रतिपादन – eNavakal
News मुंबई

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तन संदेशातून ऊर्जा घ्यावी! राहुल गायकवाडांचे प्रतिपादन

सोलापूर- वंचित बहुजन आघाडीच्या भव्य आरक्षण महाअधिवेशनातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधन, परिवर्तनाच्या संदेशातून ऊर्जा घ्यावी व येत्या काळात महाराष्ट्रात बदल घडवून आणावा. प्रत्येक घटक महत्वाचा आहे. सर्वांनी छोटा-मोठा भेद न मानता एकत्र आले पाहिजे व वंचित आघाडीला बळ दिले पाहिजे असे प्रतिपादन के. पी. गायकवाड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल गायकवाड यांनी केले. सोलापूर येथे आज पार्क मैदान आंबेडकर चौकात झालेल्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य आरक्षण महाअधिवेशनावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना राहुल गायकवाड म्हणाले की, तालुक्यातून प्रत्येक बहुजन आता स्वत: बदल घडवायचे या उत्साहाने या रॅलीत सहभागी होत आहेत. तर भारीप तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्याध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूरातील सभेला तालुका भारीपच्यावतीने हजारोंच्या संख्येने 100 हून जास्त वाहनातून नागरिक उपस्थित राहिले आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर ‘तुम आगे बढो’च्या जयघोषात भीमसैनिक सोलापूरला रवाना झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More