‘अॅलिझ’ने टेनिस कोर्टवर टॉप बदलला तर काय बिघडले? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

‘अॅलिझ’ने टेनिस कोर्टवर टॉप बदलला तर काय बिघडले?

न्यूयॉर्क – वर्षातील अखेरची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन ओपन स्पर्धा सध्या चांगलीच गाजत आहे. फ्रान्सची टेनिस खेळाडू अॅलिझ  कोर्नेट हिला मॅच रेफ्रीने सुनावलेली शिक्षा आणि त्यानंतर लैगिंक भेदभावाच्या झालेल्या आरोपांमुळे या स्पर्धेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

जागतिक क्रमवारी 31 व्या स्थानावर असणारी अॅलिझ कोर्नेटने सामन्यादरम्यान ब्रेक संपवून परत येताना आपला टॉप बदलला. ब्रेक संपवून परत येत असताना तिच्या लक्षात आले की आपण टॉप उलटा घातला आहे. म्हणून अॅलिझ कॉर्नेटने अवघ्या १० सेकंदामध्ये कॅमेराकडे पाठ करून टॉप व्यवस्थीत करून पुन्हा घातला. अॅलिझ कॉर्नेटने टॉपच्या आत स्पोर्ट्स ब्रा घातली होती त्यामुळे अंगप्रदर्शन झाले नाही. या सामन्यात कोर्नेटला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र मॅच रेफरिंनी तिला कोड वॉयलेशनमध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

मॅच रेफ्रीच्या या निर्णयाचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अॅलिझला शिक्षा सुनावल्याप्रकरणी मॅच रेफरिंवर लैंगिक भेदभावाचा आरोप केला आहे. यापूर्वी देखील फान्स ओपनमध्ये सेरेना विलियम्सच्या केट ड्रेसवर बंदी घालण्यात आली होती. पण अमेरिकन ओपनसह अनेक स्पर्धांत पुरुष खेळाडू बिना टी शर्टचे दिसत आहेत. अमेरिकन ओपन स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने उष्णतेमुळे १० मिनिटांचा ब्रेक घेतला तेव्हा त्याने कोर्टवरच शर्ट काढला. नेटकऱ्यांनी याचे काही फोटो ट्वीट करत फक्त महिला खेळाडूला शिक्षा सुनावणे हा लैंगिक भेदभाव असल्याचे म्हटले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More