अॅमेझॉन भरणार ७५ हजार रिक्त पदे – eNavakal
अर्थ देश विदेश

अॅमेझॉन भरणार ७५ हजार रिक्त पदे

नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. बेरोजगारीचं संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अॅमेझॉनने खुषखबर दिली आहे. अॅमेझॉनने गेल्या काही दिवसांत १ लाख पदे भरली होती, तर आता ७५ हजार पदं भरणार असल्याची माहिती दिलीय. त्यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली.

अॅमेझॉनने दिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय की, आम्ही गेल्या महिन्याभरात एक लाख पदे भरली. तसेच अमेरिकेतील विविध जागांवर हे नवीन भरती करण्यात आलेले कर्मचारी काम करणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांना अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. लोकांना व्यवस्थित सेवा देता यावी यासाठी कंपनी आणखी ७५ हजार जणांची भरती करणार असल्याची माहितीही यात देण्यात आली आहे.

गेल्या तीन आठवड्यात अमेरिकेत १.६८ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेत लॉकडाऊन असल्याने पूर्णपणे देश बंद आहे. ज्या ठिकाणी केवळ लोक काम करू शकतात. त्या ठिकाणी नोकर कपात करण्यात आली आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर त्या व्यक्तींना पुन्हा कामावर बोलावण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसमुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. हॉस्पिटिलिटी, रेस्टॉरेंट आणि ट्रॅव्हल यासारख्या क्षेत्रांतील लोकांच्या एक तर नोकऱ्या गेल्या आहेत किंवा हे लोक सुट्टीवर पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे अॅमेझॉन अशा लोकांचे स्वागत करीत आहे. तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी काम करू शकतात, असे अॅमेझॉनने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’

मुंबई – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. महाराष्ट्र राज्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार

मुंबई – संगमनेर तालुक्यातील मंगळापुरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण

मुंबई – राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला केलेली मदत वादाच्या भोवऱ्यात, बेकायदा व्यवहार झाल्याचा दावा

मुंबई – कोरोनाकाळात शिवभोजन योजनेसाठी आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने राज्य सरकारला १० कोटींची मदत केली होती. मात्र, ही मदत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More