अॅंटिग्वा आणि बारबुडा या शहरात कुणालाही मिळतं नागरिकत्त्व – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

अॅंटिग्वा आणि बारबुडा या शहरात कुणालाही मिळतं नागरिकत्त्व

अॅंटिग्वा आणि बारबुडा या दोन शहरात कुणालाही नागरिकत्त्व मिळते. कॅरिबियन समुद्र आणि अटलांटिक महासागर यांच्या दरम्यान अमेरिकेतील वेस्ट इंडीजमधील अॅंटिग्वा आणि बारबुडा ही दोन प्रमुख बेटे आहेत. या दोन बेटांची लोकसंख्या २०११च्या जनगणणेनुसार ८१ हजारच्या जवळपास आहे. सेन्ट जॉन्स हे अॅंटिग्वामधील सर्वात मोठे बंदर आहे.

अॅंटिग्वा आणि बारबुडा या दोन कॅरेबियन शहरात कोणीही जाऊन राहू शकते. म्हणजे तिकडे गेलेल्या कोणत्याही व्यक्तीने दोन लाख डॉलर सरकारी तिजोरीत भरले की, तिकडचे नागरिकत्त्व मिळते. या शहरांचा फायदा अनेक फ्रॉड लोकांनी करून घेतला आहे. पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा अॅंटिग्वा शहरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता आणखी २८ भारतीय लोकांनी अॅंटिग्वाचे नागरिकत्त्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. २०१४ पासून २८ जणांनी अर्ज केला आणि त्यातील ७ जणांना नागरिकत्त्व मिळाले आहे.

अॅंटिग्वा आणि बारबुडा या शहरांत दुहेरी नागरिकत्त्व मिळते. नागरिकत्त्व मिळाल्यानंतर कॅरेबियन शहरांत व्यवसायही करता येऊ शकतो. तसेच अॅंटिग्वा आणि बारबुडा शहरात नागरिकत्त्व मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला या दोन शहरांव्यतिरिक्त आणखी १३० देशांमध्ये मोफत व्हिसा, प्रवेश मिळू शकतो. मेहुल चोक्सीने कायदेशीररित्या अॅंटिग्वाचे नागरिकत्त्व मिळविण्यासाठी २०१७ साली अर्ज केला होता. त्यानंतर त्याला २०१८ला नागरिकत्त्व मिळाले. याचा फायदा घेऊन तो भारतातून पसार होऊन अॅंटिग्वात राहू लागला. तो तिथे नागरिक बनल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही. भारताने त्याचा तेथील पत्ता शोधून तो तिथल्या सरकारला कळविला. अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी नागरिकत्त्व दिल्याबद्दल स्पष्टीकरण दिले की, २००७ मध्ये मेहुल चोक्सीबद्दल कोणतीही नकारात्मक माहिती तसेच त्याच्यावर कोणतेही आरोप नव्हते. त्यामुळे त्याला नागरिकत्त्व देण्यात आले. मात्र त्याचे नागरिकत्त्व रद्द करून त्याला भारतात परत पाठवा अशी मागणी तेथील विरोधी पक्ष करीत आहेत.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More