(अपडेट) जामखेड हत्याकांड: गोविंद गायकवाडवर गुन्हा दाखल – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

(अपडेट) जामखेड हत्याकांड: गोविंद गायकवाडवर गुन्हा दाखल

अहमदनगर -राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्याकांडप्रकरणी गोविंद गायकवाडसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्याकांड प्रकरणी मृत योगेशचा भाऊ कृष्णाने  फिर्याद दिलीय. या फिर्यादीत गोविंद गायकवाडसह चार ते पाच जणांनी कट करुन गोळीबार केल्याचे फिर्यादित म्हटले.  एक वर्षांपूर्वी उल्हास माने यांच्या तालमीतील मुलांबरोबर राजकीय बोर्ड लावण्याच्या वादातून हत्या झाल्याची फिर्याद दिलीय. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात हत्या, कट आणि दंगा त्याचबरोबर आर्म अॅक्टचा गुन्हा  गोविंद गायकवाडसह पाच अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.  केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज जामखेड बंद पुकारण्यात आला आहे. यात काल रात्री दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवल्यावर पालकमंत्री राम शिंदे रुग्णालयात आले. मात्र संतप्त जमावाच्या रोषाला त्यांना सामोरे  जावे लागले व तिथून रुग्णालयाच्या मागच्या दरवाजाने त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर काल सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादीच्या दोघांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय ३०) व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात हे दोघे दुकानासमोर बसलेले असताना सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या़ त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेले.

गोळीबारानंतर ते दोघही एकाच जागेवरच पडून होते. नंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे दोन्ही रुग्ण उपचाराअभावी अर्धा तास पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गोळीबारानंतर जखमींना तातडीने नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले़. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़. दरम्यान पालकमंत्री राम शिंदे खासगी कार्यक्रमासाठी श्रीराम मंदिरात होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र लोकांचा  आक्रोश  बघता त्यांनी तिथून तात्काळ पाय काढता घेतला.

जामखेड कडकडीत बंद

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या, शवविच्छेदन अहवालामधून झाले उघड

नवी दिल्ली – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन...
Read More