‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’मध्ये बिग बॉस मराठी सदस्यांची धमाल – eNavakal
मनोरंजन

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’मध्ये बिग बॉस मराठी सदस्यांची धमाल

मुंबई – कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातीलसमाज सेवेमध्ये कार्यरत असलेलेराजकारणक्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. किशोर चौघुलेप्राजक्ता हनमघरभूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवत आहेत. या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळत आहे. कलर्स मराठी या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक्रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यासत्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. याच पहिल्यावहिल्या पर्वाची पहिली विजेती मेघा धाडेतसेच उषा नाडकर्णीरेशम टिपणीस, सई लोकूरस्मिता गोंदकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये बिग बॉसच्या या बिनधास्त सदस्यांनी पहिल्यांदाच बेधडक खुलासे केले आहेत. 

कार्यक्रमामध्ये गप्पा आणि गोष्टीबरोबर अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले ज्याची उत्तर यांनी दिली आहेत. जसे मेघा धाडेला मकरंद यांनी विचारले कि तू बिग बॉसच्या वेळेस मत मॅनेज केले होते हे खरे आहे का तसेच उषा नाडकर्णी यांना विचारले तुमच्या फटकळ स्वभावाने बरेच दुखावले जात असतील तुम्हाला हे मान्य आहे का सईला बिग बॉसच्या प्रवासामध्ये कोणा ना कोणाची तरी साथ वा आधार लागला त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकली असं प्रेक्षकांना वाटत होत… असं का घडलं बिग बॉस मध्ये टिकून राहण्यासाठी बिकीनिचा आधार स्मिता तुला का घ्यावासा वाटला याबद्दल काय सांगशील ? या प्रश्नांची उत्तरं हे सदस्य काय देतील काय सांगतील हे तुम्हाला या आठवड्या मध्ये बघायला मिळणार आहे. तसेच या सदस्यांसोबत गाणी ओळखण्याचा खेळ देखील खेळण्यात आला. ज्यावेळेस सईने मकरंद अनासपुरे यांसोबत डान्स केला.

याबरोबरच मेघाने तिची मुंबईमधील प्रवासाची गोष्ट आणि वेगवेगळे अनुभव सांगितले. सईने राजेश श्रुंगारपूरे याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट सांगितली आहे तर मेघाने किशोर चौघुले यांबाबत सांगितले. या भाग बघायला आणि या बेधडक सदस्यांबद्दल जाणून घ्यायला नक्कीच मज्जा येणार आहे. या पाच जणींना एक छानशी भेट देखील देण्यात आली. त्याचबरोबर या सदस्यांसाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एक छोटासा मेसेज दिला ज्यामध्ये मेघासाठी पंढरीनाथ कांबळी तर सईसाठी तिची आई वीणा लोकूररेशमसाठी हर्षदा खानविलकरउषा ताईसाठी अलका कुबल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. १४ एप्रिल १९२२ साली झाला. अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

अनंतनाग – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मागील २४ तासांत दुसरी चकमक झाली असून जवानांनी वघामा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले....
Read More