असद दुर्रानींना प्रसार माध्यमांशी बोलण्यास  बंदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

असद दुर्रानींना प्रसार माध्यमांशी बोलण्यास  बंदी

इस्लामाबाद – पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) असद दुर्रानी यांच्यासह लष्कराच्या मीडिया विंगच्या दोन माजी प्रमुखांना संरक्षण विश्लेषक म्हणून मीडियाशी बोलण्यास पाकिस्तानी लष्कराकडून बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान लष्कराच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)ने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेत, सशस्त्र दलाच्या 26 निवृत्त अधिकार्‍यांना संरक्षण विश्लेषक म्हणून माध्यमाशी संवाद साधण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. तर, निवृत्त ब्रिगेडियर महमूद शाह, निवृत्त ले. ज. असद दुर्रानी, निवृत्त ले. ज. तलत मसूद, निवृत्त मेजर अमिर आणि निवृत्त मे. ज. अतर अब्बास आणि निवृत्त मे. ज. रशिद कुरेशी यांची नावे काढून टाकली आहेत. संरक्षण विश्लेषक म्हणून मीडियाशी संवाद साधताना त्यांची मते, विचार हे वैयक्तिक असतील. त्यांच्या मताशी लष्कराचा संबंध नसणार, असेही त्यात म्हटले आहे. तसेच, संरक्षण विश्लेषक म्हणून उपस्थित राहण्याची इच्छा असलेले अन्य निवृत्त अधिकारी  ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ‘आयएसपीआर’शी संपर्क साधू शकतात, असेही यात म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More