अश्विन-यादवने आफ्रिकेला 275 धावांत गुंडाळले – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा महाराष्ट्र

अश्विन-यादवने आफ्रिकेला 275 धावांत गुंडाळले

पुणे – भारत- द. आफ्रिका संघातील दुसर्‍या कसोटी सामन्यात तिसर्‍या दिवशी भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या सुरेख मार्‍यासमोर आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत आटोपला. अश्विनने 4 तर यादवने 3 बळी घेतले. उपहारानंतर आफ्रिकेची 8 बाद 162 धावा अशी घसरगुंडी उडाली होती. पण 9 व्या विकेटसाठी गोलंदाज महाराज आणि फिलेंडरने 109 धावांची सुरेख भागीदारी करून आफ्रिकेला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
या दोघांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच तडाखा दिला. महाराजने आपले कसोटीतील पहिले अर्धशतक फटकावले. तर फिलेंडर 44 धावा काढून नाबाद राहिला. कालच्या 3 बाद 33 धावा या धावसंख्येवरून आफ्रिकेने आपला पहिला पुढे सुरू केला. नोर्जेला शमीने 3 धावांवर बाद करून भारताचा सुरुवातीलाच यश मिळवून दिले. त्यानंतर ब्रुयानलादेखील उमेश यादवने 30 धावांवर बाद करून भारताला दुसरे झटपट यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार डुप्लिसीस आणि यष्टिरक्षक डिकॉक यांनी 6 व्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करून त्यांचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला.
अखेर उपहारानंतर अश्विनने डिकॉकचा 31 धावांवर त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. त्याने 48 चेंडू खेळताना 7 चौकार मारले. त्यानंतर आलेल्या मुथू स्वामीला जडेजाने 7 धावांवर पायचीत केले. कर्णधार डुप्लिसीसने 64 धावांची अर्धशतकी खेळी करून त्यांची एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. अखेर चहापानाला थोडावेळ बाकी असताना अश्विनने डुप्लिसीसला रहाणेमार्फत 64 धाावांवर झेलबाद केले. त्यानंतर मात्र महाराज-फिलेंडर ही जोडी जमली.
या दोघांनी संयमी फलंदाजी करून आफ्रिकेची पडझड रोखली. भारतीय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा दोघांनी यशस्वीपणे मुकाबला केला. अखेर जमलेली ही जोडी फोडण्यासाठी विराटने लगेचच 80 षटकांनंतर दुसरा नवा चेंडूदेखील घेतला. पण त्याचाही फारसा फायदा भारताला झाला नाही. अखेर खेळ संपायला थोडा वेळ बाकी असताना महाराजला अश्विनने रहाणेमार्फत 72 धावांवर झेलबाद करून अखेर ही जोडी फोडली. त्याने 132 चेंडू खेळताना 12 चौकार मारले. नंतर आलेल्या रबाडाला अश्विनने 2 धावांवर पायचीत करून आफ्रिकेचा डाव संपवला. फिलेंडरने 192 चेंडू खेळताना 6 चौकार मारून नाबाद 44 धावा केल्या. भारतातर्फे अश्विनने 4, यादवने 3, शमीने 2 आणि जडेजाने 1 बळी घेतला. भारताने पहिला डाव 5 बाद 601 या धावसंख्येवर घोषित केला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More