अवैध दारुसह किरीट सोमैयाला अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

अवैध दारुसह किरीट सोमैयाला अटक

ठाणे– कारमधून अवैध दारु घेऊन जाणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करत पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव किरीट रामजीभाऊ सोमैया आहे. घोडबंदर रोडवर पोलिसांनी इंडिका कारचा पाठलाग करत ती गाडी पकडली. या गाडीला काळ्या काचा लागल्या असल्याने ही गाडी थांबवत पोलिसांनी याबाबत विचारणा केली. तेव्हा या गाडीत १४ गावठी दारूचे फुगे टायरच्या ट्यूबमध्ये ठेवलेले आढळून आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला बहुतांश नागरिकांना हे सोमैया भाजप खासदार किरीट सोमैयाच आहे की काय? अशी चर्चा देखील सर्वसामान्यांमध्ये सुरु होती. मात्र या प्रकरणाशी भाजप खासदार सोमय्या यांच्याशी काहीही संबंध नाही. केवळ नाव सारखे असल्यामुळे या चर्चेला उधान आले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More