अवघी 71 मतदार संख्या असलेल्या गावाची निवडणूक यावेळीही होणार बिनविरोध – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र

अवघी 71 मतदार संख्या असलेल्या गावाची निवडणूक यावेळीही होणार बिनविरोध

रत्नागिरी- राज्यातील सर्वात छोट्या गावालाही आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. 27 डिसेंबरला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जुवे- जैतापूर ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. आजपर्यंत या गावाने ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध केलेली आहे. या गावाचे वैशिट्य म्हणजे हे जैतापूर खाडीच्या पाण्याने उभ्या गावाला चारही बाजूंनी वेढले आहे.
राजापूर तालुक्यातील जुवे-जैतापूर गाव हे एका बेटावर वसलेले आहे. राज्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून जुवे-जैतापूर ओळखली जाते. 1969 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. सध्या या गावाची लोकसंख्या आहे केवळ 78. मतदार आहेत 71 आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. 27 डिसेंबर रोजी या गावाची निवडणूक लागलेली आहे. आजतागायत या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. यावर्षी यावेळीसुद्धा ही परंपरा कायम ठेवली जाणार असल्याचे इथले ग्रामस्थ सांगतात.
या गावचे क्षेत्र अवघे 45 हेक्टर एवढे आहे. या गावात 109 घरे आहेत. पण बहुतांश घरे बंद असतात. पण जे इथे असतात ते गुण्यागोविंदाने राहतात. विशेष म्हणजे या गावाच्या चारही बाजूंना खाडी असली तरी गावातील विहिरींचे पाणी गोड आहे. येथील लोक उपजीविकेसाठी मासेमारीकडे वळले आहेत. गावात तीन मंदिरे आहेत. एक शाळा आहे आणि विद्यार्थी मात्र दोन. पण या गावात होडी व्यतिरिक्त कोणतेही दळणवळणाचे साधन नाही. विद्यार्थ्यांना, आजारी रुग्णांना होडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे इथे रस्ता व्हावा, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More