अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी धास्तावले – eNavakal
News महाराष्ट्र

अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी धास्तावले

कवठे येमाई – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण होत असल्याने शेतकरी धास्तावले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.ढगांचा कडकडाट,वादळी वारे व काळेकुट्ट ढग व पावसाचा पडणारा जेमतेम शिडकावा एकीकडे कडक उन्हाळा,त्यातच पाणीटंचाईचे संकट व आता अवकाळीचे अस्मानी संकट अशा सर्वच बाजूनी शेतकरी संकटात सापडले असून उपलब्ध पाण्यावर घेतलेला व काढणी केलेला कांदा, पडलेले बाजारभाव व अवकाळी पावसाचा धसका घेत दगडी चाळीत साठविण्याचे युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
शिरूरचा पश्चिम भाग हा कांदा पिकाचे आगर समजले जाते. बाजारभाव असल्यास हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पीक घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो. कवठे येमाई येथील शेतकरी विलास बांगर यांनी आपल्या जेमतेम जमिनीत कांदा पीक घेतलेय. अहोरात्र काबाडकष्ट घेऊन हाताशी आलेला कांदा चार पैसे होतील या आशेने व अवकाळीच्या तडाख्यात सापडू नये म्हणून बांगर कुटुंब भल्या पहाटेपासूनच आज कांदा दगडी चाळीत भरण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
हीच परिस्थिती तालुक्याच्या पश्चिम भागातील सविंदणे, मलठण, पिंपरखेड, टाकळी हाजी व इतरही गावात असून अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकर्‍यांची आहे ती पिके वाचविण्याची धावपळ पाहावयास मिळत असून शेतकरी मात्र सर्वच बाजुंनी संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More