अलिबाग ते भाऊचा धक्का रो.. रो.. सेवा ताटकळली – eNavakal
News महाराष्ट्र

अलिबाग ते भाऊचा धक्का रो.. रो.. सेवा ताटकळली

अलिबाग- भाऊचा धक्का ते मांडवा रो.. रो.. बोटसेवेची तिसरी डेडलाइनही टळून गेली तरी ठेकेदार सापडत नसल्याने मेरीटाईम बोर्डाची मोठी गोची झाल्याचे उघडकीस आले आहे. रो.. रो.. बोटसेवा चालवण्यासाठी तीन वेळा निविदा काढूनही ठेकेदारांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे ही सागरी प्रवासी सेवेचा मुहूर्त महिनोंमहिने पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

गौरी-गणपती आधी रो.. रो.. बोटसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रो..रो.. सेवेबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांवरील प्रवास नकोसा वाटतो. आपले स्वतःचे वाहन घेऊन गौरी-गणपतीच्या सणासाठी कुटुंबासह वेळेत पोहचण्याची कसरत दरवर्षी करावी लागते. मुंबईपासून काही अंतरावर असतानाही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पहिल्या आरतीला पोहचता आलेले नाही. रो.. रो.. बोटसेवेमुळे हे स्वप्न या वर्षी पूर्ण होईल असे वाटत असतानाच ठेकेदारांनी खो घातल्यामुळे चाकरमान्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. भाऊचा धक्का ते मांडवा ही बहुप्रतिक्षीत रो..रो.. सेवा पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याची घोषणा करण्यात आली होती. मांडवा येथील ब्रेकवॉटर सिस्टीम आणि जेट्टीचे काम जून महिन्यात पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा कक्षाची सजावट, पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 ऑगस्टला ही सेवा सुरू होईल, असा दावा मेरीटाईम बोर्डाने केला होता. त्यानंतर जेएनपीटी येथील कार्यक्रमात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, अशी नव्याने घोषणा केली. मात्र रो.. रो..बोटसेवा चालवण्यासाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याने सर्व यंत्रणा सज्ज असतानाही मेरीटाईम बोर्डाची बोट अजूनही धक्क्यालाच आहे.

मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतुकीला आज 1 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. समुद्र अद्याप अशांत असल्याने पीएनपी, मालदार, अजंठा या कंपन्यांनी प्रवासी सेवा सुरू केली नव्हती. गणपती उत्सवापूर्वी ही सेवा सुरू होत असल्याने अलिबाग, मुरूडमधून मुंबईत सणाच्या खरेदीसाठी जाणे
सुलभ होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More