अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतीगृहात बॉम्ब बनवण्याचे साहित्य – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतीगृहात बॉम्ब बनवण्याचे साहित्य

अलाहाबाद – उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद विद्यापीठामधील वसतीगृहात बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडल्याने खळबळ उ़डाली आहे. येथे पोलिसांच्या छापेमारीनंतर पोलिसांनी होस्टेलच्या 58 खोल्या सील केल्या असून अनेक गाड्याही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी अचानक केलेल्या छापेमारीमुळे विद्यार्थीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी 21 वर्षीय रोहित शुक्ला नावाच्या विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी विद्यापीठाच्या हॉस्टेलची कसून तपासणी केली. हॉस्टेलमध्ये अवैधरित्या राहणार्‍या विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी हॉस्टेल खाली करून घेण्यासाठी निमलष्करी दलाची मदत घेतली. पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये हॉस्टेलमध्ये बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडले. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईवर समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्या रिचा सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिंचा सिंह यांनी ट्वीट करून हॉस्टेलवरील कारवाईविरोधात आवाज उठवला आहे. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची गळचेपी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More