अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी अर्थसंकल्पाबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटरवरून जाहिरातीसह ट्विट पोस्ट करण्यात आले. यावर अर्थसंकल्प आधीच उघड झाल्याचा आक्षेप घेत विरोधकांनी सभात्याग केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल पंधरा मिनिटांनी ट्विट पोस्ट केले आहे त्यामुळे अर्थसंकल्प आधीच उघड झालेला नाही, असे म्हणत विरोधकांनी नवीन माध्यमांचा वापर करणे शिकावे, असा टोला यावेळी लगावला. परंतु मुनगंटीवार स्वत: अर्थसंकल्प वाचन करत असताना त्यांच्या अकाउंटवरून इतर कोणीतरी ट्विट केले याचा अर्थ अर्थसंकल्प फुटला असे सांगत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच हा गोंधळ सुरू असताना सभापतींनी १० मिनिटांसाठी अर्थसंकल्प वाचन थांबवल्याने भाजपा व शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असून अविश्वास ठराव मांडण्याच्या तयारीत आहेत.

सन 2019 -20 अतिरिक्त अर्थसंकल्प (ठळक वैशिष्ट्ये) 

अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

शिवरामराजे भोसलेंचे स्मारकही उभारण्यात येणार

दुध उत्पादक शेतक-यांना अनुदान, दुधसंघ व खाजगी दुग्ध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन म्हणून रु. ४७४ कोटी ५२ लक्ष इतका निधी वितरीत

विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट. यासाठी शासनामार्फत रु. 300 कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी रु.150 कोटी चालू वर्षात उपलब्ध करुन देणार

राज्यातील होतकरु युवक,  युवतींसाठी राज्याची सर्वसमावेशक स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरु करणार. योजनेंतर्गत यंदा जवळपास 10 हजार लघू उद्योग सुरु करण्याचे नियोजन

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला १५० कोटींची मदत

बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता रु. 1 हजार 531 कोटी एवढी भरीव तरतूद

केंद्र शासनाकड़ून 4563 कोटींपैकी 49 कोटी निधी प्राप्त झाला

4461 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

साडेचार वर्षात 140 सिंचन प्रकल्प पूर्ण

दुष्काळासाठी 6 हजार कोटींची तरतूद

जलसंपदा खात्यासाठी 12597 कोटी प्रस्तावित

सुक्ष्म सिंचन अनुदानासाठी 350 कोटी

19-20 मध्ये 25 हजार शेततळी उभारण्याचं उदिष्ट्य

शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न

3 लाख कोटींच्या रस्ते बांधणीला मंजूरी

80 तालुक्यात फिरती  पशू चिकित्सालय

नागपुरच्या बोराडीत विद्युत औष्णिक प्रकल्प

१0 हजार लघू उद्योग सुरू करून महिलांना रोजगार

75 हजार कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचा उदिष्ट्य

वस्त्रोद्योग धोरणासाठी 540 कोटी खर्च अपेक्षीत

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीसाठी 150 कोटी

खादी ग्रामोद्योगसाठी 100 कोटी

गोवर्धन योजनेत आतापर्यंत १७ कोटी खर्च

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ११४ कोटींचा निधी दिला

काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी १०० कोटी निधीचा तरतूद

शेतकऱ्यांच्या शेतमालास बाजारपेठ मिळवून देणे, मुल्यसाखळी यासाठी  2 हजार 220 कोटींची तरतूद

४ कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ४ हजार ५६३ कोटींचा निधी मिळाला

गोपीनाथ मुंडे विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश

शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न

शेतकऱ्यांची वीज खंडित न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

१ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली

पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना

२८ हजार ५४२ गावांमध्ये दुष्काळ

१५१ तालुक्यांत दुष्काळ घोषित

गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी खर्च

शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा छावण्याची निर्मिती केली

१ हजार ६३५ चारा छावण्या राज्यात सुरू करण्यात आल्या आहेत

१५ हजार ३०० कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More