अयोध्या खटल्याचा उद्या निकाल – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

अयोध्या खटल्याचा उद्या निकाल

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष ज्या खटल्याकडे लागले आहे, त्या अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट उद्या शनिवार, 9 नोव्हेेंबर रोजी आपला निकाल सुनावणार आहे. या ऐतिहासिक निकालाच्या सुनावणीसाठी उद्या सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात होणार आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. अयोध्येलाही पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. अतिगर्दी, धार्मिक स्थळांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शासनाने सोशल मीडियावरही नजर ठेवली आहे. दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्याआधी हा निकाल येणे निश्‍चित होते. त्यानुसार उद्या सुप्रीम कोर्ट हा निकाल देणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More